नशिराबाद येथील ग्रामदैवत व लाखो भक्तगणांचे श्रद्धास्थान प.पु.श्री झिपरू अण्णा महाराज यांना भजे, बेसन - भाकरी व सतत बिडी ओढणे आवडत असे. त्याच अनुषंगाने प.पु.श्री झिपरू अण्णा महाराज समाधी मंदिरातही भाविकांना प्रसाद मिळावा म्हणून दर गुरुवारी बेसन - भाकरीचा प्रसाद भक्तगणांना मोफत मिळावा अशी संकल्पना समितीचे विश्वस्त अॅड. मोहन दिगंबर देशपांडे व विश्वस्त सुरेश रामदास अकोले यांनी मांडली. त्याबाबत विचार विनिमय होऊन स्मारक समितीने बेसन - भाकरीचा प्रसाद दर गुरुवारी वाटप करावा असे ठरविण्यात आले. त्यानुसार १८ मे २००६ पासून सुरेश रामदास अकोले व अॅड. मोहन दिगंबर देशपांडे यांनी स्वखर्चाने बेसन-भाकरीच्या प्रसाच्या उपक्रमाला सुरुवात केली व हा उपक्रम अखंडपाने सुरु ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे भक्तगणांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम तेव्हापासून अखंडपणे सुरु आहे. भाविकांनी प्रसादासाठी लागणारे पैसे आधीच देऊन वर्षाआधीच नोंदणी केलेली असते. वाढदिवस-पुण्यतिथी किंवा सणवार-उत्सवासाठी या प्रसादासाठी नोंदणी भाविकांकडून होत असते. एखाद्या गुरुवारी उपवासाचा अथवा सणावाराचा दिवस असल्यास त्यादिवशी फराळाचे पदार्थ वाटप केले जातात. यशस्वीपणे व अखंडपणे हा उपक्रम सुरु असून त्यात स्मारक समितीचे रमेश सराफ, विनायक वाणी, पोपट कासार, मंगल तारकस, सुरेश अकोले, अॅड. मोहन देशपांडे, सुधीर मोहरीर, कैलास व्यवहारे, गणपत भारुळे, पुजारी जयंत गुरव, तुळशीराम म्हसकर यांच्यासह गावातील व पर्गावातील भक्तगण सहकार्य करीत असतात. प्रसाद नोंदणीसाठी योग्य ती देणगी आकारली जाते व त्याची पावतीही दिली जाते. त्याचप्रमाणे स्पेशल अन्नदान निधीसाठीहीअनेक भक्तगणांनी आर्थिक मदत दिलेली आहे. आपण सर्वांच्या सहकार्यातूनच व श्री अण्णा महाराजांच्या कृपेने हा प्रसादाचा उपक्रम अखंडपाने सुरु आहे. आपणही या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. धन्यवाद!