प.पु.श्री झिपरू अण्णा महाराजांचे जीवनचरित्र

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु | गुरुर्देवो महेश्वर: || गुरु साक्षात परब्रम्ह | तस्मै श्री गुरुवे नम: ||

भारतात प्राचीन काळापासून अनंत ऋषी-मुनी-साधु-संत होऊन गेले. महाराष्ट्रात संत श्री ज्ञानेश्वर-निवृत्तीनाथ-तुकारामासारखे अनेक संत झाले. शिर्डीचे साईबाबा, शेगावचे श्री गजानन महाराज यांचे परंपरेतील एक महान विभुती नृसिंहपूर (नशिराबाद) जिल्हा-जळगाव येथे होऊन गेली. सन १७७८ मध्ये विणकर (साळी) समाजात जन्मास आली. पित्याचे नाव मिठाराम व आईचे नाव सावित्री.

श्री झिपरू अण्णा वयाचे १०/१२ सुमारास श्री लक्ष्मिनारायण मंदिराचे श्री कल्याणदास महाराज यांचा अनुग्रह झाला. ते ज्ञानी होते. अनुग्रहानंतर श्री झिपरू अण्णा हे नेहमी चिंतनात मग्न असत. त्यांनी कपडेलत्त्यांचा त्याग केला. ते गावात नग्नावस्थेतच फिरत असत. सर्वच धर्माचे लोक त्यांना प्रेमाने व आदराने पाहत असत. आबाल-वृद्ध तरुण व स्त्रिया ही त्यांचे दर्शन व आशीर्वाद घेत असत. त्यांना वाचासिद्धी होती. तसेच भविष्याच्या घटनाही त्यांना समजत. न विचारता ते जे बोलत तसेच घडत असे.

श्री गणेशपुरीचे श्री मुक्तानंद स्वामींनी १४ वर्षापर्यंत नाशिराबादेस येऊन-जाऊन श्री अण्णांची सेवा केली. श्री झिपरू अण्णा महाराजांच्या कृपेने व आशीर्वादाने ते गणेशपुरीस श्री नित्यानंद बाबांच्याकडे गेलेत. तेथेच त्यांच्या जीवनाचे कल्याण झाले.

श्री अण्णा महाराज यांचे निर्वाण शनिवार दि. २१ मे, १९४९ रोजी वैशाख वाद्य नवमीस नशिराबादचे त्यांचे निष्ठावंत भक्त श्री भय्याजी हणमंत कुलकर्णी यांचे घरी झाले. श्री यशवंत माधव वाणी यांनी वाकी नदी तीरी स्वताच्या धर्मशाळेतच श्री अण्णांच्या समाधीसाठी जागा दिली. श्री पंढरीनाथ दगडु भोळे यांना श्री अण्णांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला व सांगितले कि माझे गुरु श्री कल्याणदास महाराज यांची समाधी बांध. त्याप्रमाणे त्यांचे पुतणे, सचिन भानुदास भोळे यांनी सदर समाधी दि २८ मार्च १९९२ रोजी बांधली.

शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, पद्मालायाचे गोविंद महाराज, आळंदीचे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, धुनिवाले महाराज यांच्याप्रमाणे झिपरूअण्णा महाराजही अजानुबाहु होते.

जरी मी देह ठेविला, आत्मा येथेची रमला |

श्रद्धा ज्याची जैसी, त्यास तैसी प्रचीती |

भक्ताचे हाकेशी धावून येईन मी ||