श्री झिपरू अण्णांच्या वास्तव्यामुळे नशिराबाद हे गाव सिद्धक्षेत्र झाले आहे. नशिराबाद हे महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील गाव. हे गाव मध्य रेल्वे मार्गावरील भादली रेल्वे स्टेशन जवळ आहे. भादली रेल्वे स्टेशन पासून ३ किमी अंतरावर नशिराबाद आहे.
नशिराबादला येण्यासाठी प्रथम आपणास जळगाव किवा भुसावळला यावे लागेल. जळगावहून भुसावळला जाणार्या ओर्डीनरी ST बसने आपणास नशिराबाद ला येता येते. जळगावहून नशिराबाद हे फक्त १० किमी अंतरावर आहे. तसेच भुसावळहून जळगाव कडे येणाऱ्या ओर्डीनरी ST बसने नशिराबादला येत येते. नशिराबादला एसटी बस थांबते. येथे बसस्थानक आहे. बसस्थानकावर उतरल्यावर गावात जायला फक्त एकच रस्ता दिसतो. त्या रस्त्याने गावात शिरून सरळमार्ग धरून थेट ग्रामपंचायत ऑफिस पर्यंत यावे. ह्या ग्रामपंचायत ऑफिसमागे वाकी नदी आहे. याच नदीकाठी श्री झिपरू अण्णांची भव्य समाधी आहे.