प. पु. श्री झिपरू अण्णांचे माहात्म्य सर्वांपर्यंत पोहचवून झिपरू अण्णांनी दाखवलेला भक्तीचा मार्ग अधिकाधीक भाविकांनी आत्मसात करावा व त्याचा त्यांच्या अध्यात्मिक जीवनात चांगला परिणाम दिसावा म्हणून प. पु. श्री झिपरू अण्णा स्मारक सेवा समितीने श्री झिपरू अण्णांचे माहात्म्य "सदगुरू श्री झिपरू अण्णा माहात्म्य" या नावाने पुस्तकरुपात प्रकाशित केलेले आहे. हे पुस्तक मराठी व हिंदी भाषांमध्ये स्मारकाच्या ऑफिसमध्ये नाममात्र शुल्क देऊन घेऊ शकतात. या पुस्तकाचे लेखक श्री. पुं. धों. झांबरे आहेत. तर कै. हरीकृष्णादास शंकरदास मेहता हे प्रकाशक आहेत.
तसेच स्मारक समितीने श्री झिपरू अण्णां महाराजांच्या दिव्य चरित्रावर आधारित एक माहितीपटदेखील निर्मित केलेला आहे. तो CD च्या स्वरुपात आपणास समितीच्या कार्यालयातून मिळवता येऊ शकतो. या माहितीपाटाचे निर्माते प.पु. श्री झिपरू अण्णा स्मारक समिती असून श्री सुनील भटकर यांनी त्याचे दिग्दर्शन केलेले आहे.